शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींचा विनयभंग;पाच जणांना अटक

Monday, 29th October 2018 07:02:04 AM

गडचिरोली, ता.२९: जंगलात मित्रांसमवेत गप्पा करीत असलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंगग करणाऱ्या पाच जणांना पेरमिली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

बंटी अजय भेंडे(१७),यशवंत मनोहर दुर्गे(१९), प्रथमेच रमेश दहागावकर(१८),अमरदीप विस्तारी झाडे(१७)व मानतू शंकर इष्टाम(३०)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

भामरागड तालुक्यातील रहिवासी असलेली मुलगी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. ती शेजारच्या जंगलात मित्रांसमवेत गप्पा करीत असताना उपरोक्त पाचही जण तेथे गेले. त्यांनी पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग करुन मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने पेरमिली येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी उपरोक्त पाचही आरोपींवर भादंवि कलम ३५४(अ)(ब), ३२३,५०४, ५०६,३४,बालैंअसं अधिनियम २०१२ च्या कलम ८ व १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ई)अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E455A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना