शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

प्रा.राम वासेकर यांना पीएचडी

Thursday, 27th September 2018 02:35:19 AM

गडचिरोली, ता.२७: चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा(रै) येथील युवा कवी प्रा. राम वासेकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली आहे. 'मराठी आदिवासी कवितेचा विविधांगी चिकित्सक अभ्यास' हा प्रा.वासेकर यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. त्यांना प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त झाली होती. त्यांचे वाङ्मयीन संशोधनसुद्धा प्रसिद्ध झाले आहे. प्रा.वासेकर हे ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात कार्यरत आहेत. आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HU56R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना