गुरुवार, 20 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

'मुक्तीपथ'च्या संघटकास विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Wednesday, 5th September 2018 02:52:45 PM

गडचिरोली, ता.५: नागरिकांना व्यसनमुक्त बनविण्यासाठी कार्यरत 'मुक्तीपथ' या प्रकल्पाच्या चामोर्शी तालुका संघटकास चामोर्शी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. संदीप गोविंद वखरे(२७)रा. झिरपी, ता.अंबड, जि.जालना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

'मुक्तीपथ' प्रकल्पाद्वारे दारु व तंबाखूच्या आहारी गेलेल्या नागरिकांना व्यसनमुक्त करण्याचे काम केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्थळी मुक्तीपथचे कार्यालय असून, त्यात विविध पदांवर काही व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. संदीप वखरे यास चामोर्शी येथे मुक्तीपथचा तालुका संघटक म्हणून काम देण्यात आले. तो चामोर्शी येथे एका व्यक्तीच्या घरी भाड्याने वास्तव्य करीत होता. व्यसनमुक्तीच्या कामाच्या अनुषंगाने त्याची एका मुलीला ओळख झाली. दलित समाजाची असलेल्या या मुलीला आरोपी संदीप वखरे याने १४ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी बोलावले. त्यानंतर संदीपने तिच्याशी अभद्र व्यवहार करुन तिचा विनयभंग केला. एवढेच नाही, तर त्याने पीडित मुलीच्या दोन मैत्रिणींशी त्याचप्रकारचे कृत्य करुन त्यांचा लैंगिक छळ केला. विशेष म्हणजे, हा प्रकार ३० ऑगस्ट २०१८ रोजीही करण्यात आला. ३० ऑगस्टच्या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीने १४ फेब्रुवारी रोजी ज्या मुलींशी असा प्रकार करण्यात आला;त्यांच्याशी चर्चा केली. एका मुलीने ३० ऑगस्टला, तर अन्य दोघींनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार केली.

तिन्ही फिर्यादी मुलीच्या तक्रारीवरुन चामोर्शी पोलिसांनी भादंवि कलम ३५४(अ)(१)(२)(४), सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ३(१)(डब्लू)(आय),३(२)(अ)(ए) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
499SH
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना