शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रानमांजराची शिकार करणारे चार जण ताब्यात

Friday, 17th August 2018 08:15:05 AM

गडचिरोली, ता.१७: दुर्मिळ रानमांजराची शिकार करुन त्याचे मांस विक्रीसाठी नेणाऱ्या चार जणांना वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पितांबर ऋषी सुरपाम, दिवाकर पत्रू मेश्राम, सोमेश्वर दामोधर कांबळे व दामोधर देवाजी शेरकी अशी आरोपींची नावे आहेत.

वनपरिक्षेत्राधिकारी डी.के.कैलुके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे हे काल(ता.१६)पुलखल-मुडझा भागात वन्यजिवांची पाहणी करीत असताना संध्याकाळी मुडझा येथे काही व्यक्त बांबूचे वास्ते विकताना दिसले. अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरुन त्या व्यक्तींकडे जाण्याचा प्रयत्न करताच ते तेथून पळून गेले. बांबूचे वास्ते ताब्यात घेताना एका प्लॉस्टिकच्या पिशवीत एका प्राण्याचा मृतदेह दिसला. मृत प्राणी बाहेर काढताच तो दुर्मिळ रानमांजर असल्याची खात्री पटली. रानमांजर या प्राण्याचा समावेश वन्यजीव अधिनियम १९७२ च्या शेड्युल २ मध्ये होत असून, या प्राण्याची शिकार करणाऱ्यास ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास व १० हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी रानमांजराचे मांस ताब्यात घेऊन जवळच उभे असलेल्या दोघांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण ग्राहक असून, शिकार करणाऱ्या एका इसमास ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी श्री.कैलुके यांनी रात्री पितांबर ऋषी सुरपाम, दिवाकर पत्रू मेश्राम, सोमेश्वर दामोधर कांबळे व दामोधर देवाजी शेरकी या चार आरोपींना ताब्यात घेतले. 

मुख्य वनसंरक्षक डब्लू.आय.एटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या उपस्थितीत क्षेत्र सहायक पी.ए. जेनेकर,श्री.काळे, कवडो, बोढे,भसारकर,चव्हाण, राठोड, ठाकरे, सौ.दिकोंडावार,कु.मट्टामी, कोडापे, खोब्रागडे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यानंतर प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. रानमांजराची शिकार करणाऱ्यांना पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
M9HK0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना