शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीत डॉ़ देवराव होळी, अहेरीत राजे अम्ब्रिशराव, तर आरमोरीत कृष्णा गजबे विजयी

Sunday, 19th October 2014 07:12:50 AM

 
गडचिरोली, ता़१९
जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे डॉ़ देवराव होळी ५० हजार ९३० मतांनी तर अहेरी क्षेत्रातून भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव महाराज १९८५८ मतांनी विजयी झाले़ आरमोरी क्षेत्रात भाजपाचे उमेदवार क्रिष्णा गजबे यांनी १२ हजार ९२७ मतांची आघाडी घेऊन विद्यमान आमदार आनंदराव गेडाम यांना पराभूत केले़ 
१५ आॅक्टोबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. या  निवडणुकीत जिल्ह्यात ६६.१६ टक्के मतदान झाले. गडचिरोली मतदारसंघात १ लाख ६१ हजार ३७१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला़ 
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपा उमेदवार डॉ़देवराव होळी यांना ६९हजार ७५० एवढी मते मिळाली़ त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री आत्राम  १८ हजार २४५ मते घेऊन दुसºया क्रमांकावर राहिल्या़ ‘नोटा’ने तिसºया क्रमांकाचीमते घेतली़ ‘नोटा’वर १७ हजार ४०४ मते मिळाली़ काँग्रेसच्या उमेदवार सगुणा तलांडी यांना चौथ्या क्रमांकाची १७ हजार १४४ मते मिळाली, तर ज्यांची खूप हवा होती, ते शिवसेनेचे केसरी उसेंडी यांना केवळ १४८१० मतांवर समाधान मानावे लागले़ अशीच हवा केलेले बसपाचे उमेदवार विलास कोडापे यांना अवघी १३ हजार ७०४ मते मिळाली़ अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- कुसुम आलाम(भारिप-बमसं) २१३५, जयश्री वेळदा(अपक्ष)  १९४२, रंजिता कोडापे (मनसे)  १५५४, सुनंदा आतला(अपक्ष) १४६८, दिवाकर पेंदाम(अपक्ष)  १३०२, डॉ़ देविदास मडावी(अपक्ष) ७६४, नारायण जांभुळे (फॉरवर्ड ब्लॉक)  ६८९ व मोरेश्वर किन्नाके (अपक्ष)  यांना ४६० मते मिळाली़ या निवडणुकीत भाजपाचे डॉ़देवराव होळी ५१ हजार ५०५ मतांनी विजयी झाले़
अहेरी विधानसभा मतदारसंघात १ लाख ५० हजार ७४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ तेथे भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम १९ हजार ८५८ मतांनी विजयी झाले़ त्यांनी माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचा पराभव केला़ धर्मरावबाबा आत्राम यांना ३६ हजार ५६० मते मिळाली़ विद्यमान आमदार दीपक आत्राम यांना ३३ हजार ५५५ मते घेऊन तिसर्‍या क्रमांकावर राहिले़ ‘नोटा’ला ७३४९ मते मिळाली़ त्यामुळे ‘नोटा’ चौथ्या क्रमांकावर राहिला़  काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांना ४२५३,  रघुनाथ तलांडे (बसपा)  ३७३७, कैलाश कोरेत(अपक्ष) ३१३१, दिनेश मडावी(अपक्ष) २७०६, संतोष आत्राम(अपक्ष)  २०३१ तर शिवसेनेचे रामसाय मडावी यांना १५२४ मते मिळाली़ आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे उमेदवार कृष्णा गजबे १२ हजार ९२७ मतांनी विजयी झाले़ गजबे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेसचे विद्यमान आमदार आनंदराव गेडाम यांना ४५ हजार ६५३ मते मिळाली़ बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार कोमल ताडाम ह्या १५ हजार २९७ मते घेऊन तिसर्‍या क्रमांकावर राहिल्या़ शिवसेनेचे डॉ़ रामकृष्ण मडावी यांना १३ हजार ९०० मते घेऊन चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले़
इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- जयेंद्र चंदेल (अपक्ष)९२३२, नंदू नरोटे(अपक्ष)७८३२, नारायण वट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस) २०१९, हिरालाल येरमे(भाकप) ५३७१, चंद्रकांत तोडासे(अपक्ष) १२०५, मनेश्वर मडावी(अपक्ष) ११४४, प्रतापशहा मडावी(अपक्ष) १०१५, अतुल गरमडे(अपक्ष)६३५, अशोक कोकोडे(अपक्ष) ५५०, तर नारायण जांभुळे(फॉरवर्ड ब्लॉक)यांना  ३५२  मते मिळाली़ या मतदारसंघात ३८५४ मते घेऊन ‘नोटा’  आठव्या क्रमांकावर राहिला़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FQ8WJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना