मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Saturday, 4th August 2018 07:16:30 AM

आलापल्ली, ता.४: कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आलापल्ली येथील विलिवर्स चर्चमध्ये उघडकीस आली. मोनिका संजय भोगेवार(२४) व संजय समय्या भोगेवार(२८)अशी मृत पत्नी व पतीची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आलापल्ली येथील मन्नेवार मोहल्ल्यात संजय भोगेवार हा पत्नी मोनिका व दीड वर्षीय मुलासह वास्तव्य करीत होता. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पत्नीची प्रकृती बरी नसल्याने काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोघेही गोंड मोहल्ल्यातील बिलिवर्स चर्चमध्ये आले. तेथे प्रार्थना व पूजा-अर्चा केल्यानंतर फादर दुसऱ्या खोलीत झोपायला गेले, तर संजय व मोनिका एकत्र झोपले. आज सकाळी काही मंडळी चर्चमध्ये गेली असता त्यांना दोघेही मृतावस्थेत आढळून आले. माहिती मिळाल्यानंतर अहेरी पोलिस घटनास्थळी रवाना झाले. .

कौटुंबिक कलहातून रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात संजयने पत्नी मोनिका हिच्यावर दांड्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर भीतीमुळे संजयने चर्चमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा कयास आहे. सततच्या कटकटीमुळे संजयची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती, अशी माहिती आहे. अहेरीचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर घटनेचा तपास करीत आहेत


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ILKRV
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना