शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पाच जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Friday, 3rd August 2018 08:27:30 AM

गडचिरोली, ता.३: शासनाची आत्मसमर्पण योजना, नक्षलवाद्यांना जनतेचे मिळत नसलेले पाठबळ व विविध चकमकीत नक्षल्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला खात्मा यामुळे मत परिवर्तन झालेल्या ५ जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. साईनाथ उर्फ सत्तू चुक्कू पोदाळी, दिना उर्फ सन्नी मंगलू पुंगाटी व सुशीला उर्फ शीला उर्फ ज्योती उर्फ मदनी लक्ष्मण तलांडी,राजेश उर्फ राजू याकूब कुजूर व मंगेश उर्फ विजय बाजू गावडे अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.

साईनाथ उर्फ सत्तू चुक्कू पोदाळी(२६) हा ऑक्टोबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. त्यानंतर तो प्लाटून क्रमांक ३ व गट्टा दलममध्ये सक्रिय झाला. पोलिसांशी झालेल्या ६ चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. २ खून व १ जाळपोळीच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दिना उर्फ सन्नी मंगून पुंगाटी(२०) ही नोव्हेंबर २०१४ मध्ये जागुरगुडा(छत्तीसगड)दलममध्ये भरती झाली. त्यानंतर तिने भामरागड व गट्टा दलममध्ये काम केले. एका चकमकीत तिचा सहभाग होता. तिच्यावर एका जाळपोळीचा गुन्हा दाखून असून, शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. २८ वर्षीय सुशीला उर्फ शीला उर्फ ज्योती उर्फ मदनी लक्ष्मण तलांडी ही जून २००१ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली. २००३ मध्ये तिची बदली सीएमएममध्ये झाली. त्यानंतर कंपनी क्रमांक १०, अहेरी एरिया सीएनएम, प्लाटून क्रमांक १४ व २०१४ पासून इंद्रावती एलओएस(छत्तीसगड) मध्ये एसीएम पदावर होती. १० पोलिस-नक्षल चकमकीत तिचा सहभाग होता. ७ खून व एका जाळपोळीचे गुन्हे तिच्यावर आहेत. शासनाने तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. राजेश उर्फ राजू याकूब कुजूर(३६) हा डिसेंबर २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला. त्यानंतर कंपनी क्रमांक ४ मध्ये पीपीसीएम पदावर त्याची बढती झाली. २०१० मध्ये दद्विाण डिविजन डॉक्टर टीममध्ये त्याची बदली झाली. २०११ पासून तो कंपनी क्रमांक १० मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत होता. एकूण १९ पोलिस-नक्षल चकमकीत तो सहभागी होता. त्याच्यावर २ खून व एका जाळपोळीचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. ३२ वर्षीय मंगेश उर्फ विजय बाजू गावडे हा नोव्हेंबर २००९ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. २०१० पासून तो प्लाटून क्रमांक १४ मध्ये पीपीसीएम पदावर गेला. १० चकमकीत त्याचा सहभाग होता. ७ खून व २ जाळपोळीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

आत्मसमर्पित करणाऱ्यांमध्ये २ महिला व ३ पुरुष असून, साईनाथ व दिना हे पती-पत्नी आहेत.

यांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य नक्षल्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LY549
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना