शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रेल्वे, राष्ट्रीय महामार्गातील अडचणी दूर करा: खा.अशोक नेतेंचे नितीन गडकरींना साकडे

Saturday, 28th July 2018 07:05:24 AM

गडचिरोली, ता.२८: वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग, नागभिड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेज व राष्ट्रीय महामार्गांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करुन ही तिन्ही कामे तत्काळ मार्गी लावावी, अशी मागणी खा.अशोक नेते यांनी केंद्रीय दळणवळण व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून केली.

खा. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. तसेच विस्तृत चर्चाही केली. खा.नेते यांनी सांगितले की, वडसा-गडचिरोली रेल्वेचे काम मंजूर होऊन निधीही मंजूर आहे. परंतु वनजमीन संपादित करण्यासाठी वनविभागाकडून विलंब होत आहे. त्यामुळे वनमंत्री व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी विनंती खा.अशोक नेते यांनी केली.

नागभिड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेजचे कामही मंजूर आहे. परंतु या कामाची अंदाजपत्रकीय किंमत वाढल्याने केंद्र सरकारकडून निधीत वाढ होणे गरजेचे आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करुन वाढीव निधी मंजूर करुन द्यावा, असा आग्रह खा.नेते यांनी केला. शिवाय जिल्ह्यातून जाणाऱ्या व मंजूर असलेल्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे काम तत्काळ सुरु करुन जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढवावा, अशी मागणीही खा.नेते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. यासंदर्भात आपण जातीने लक्ष देऊ, असे आश्वासन श्री.गडकरी यांनी दिले.

याप्रसंगी खा.नेते यांचे स्वीय सहायक रवींद्र भांडेकर, सोशल मीडियाप्रमुख आनंद खजांची व अनुप अध्येंकीवार उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0P44G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना