शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जागतिक महिला दिनीच महिलेच्या डोक्यावर प्रहार

Thursday, 8th March 2018 07:54:00 AM

कुरखेडा, ता.८: जगभर आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना क्षुल्लक वादावरुन एका युवकाने शेजारच्या महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने प्रहार केल्याची घटना आज अरततोंडी येथे घडली. कल्पना रघुनाथ तिभागे(४५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

अरततोंडी येथील कल्पना तिभागे व शेजारी राहणाऱ्या लता यशवंत लोहंबरे यांच्यात आज दुपारी शेळीवरुन वाद झाला. त्यानंतर लता लोहंबरे यांचा मुलगा राकेश लोहंबरे याने कल्पना तिभागे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने प्रहार केला. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती उपसभापती मनोज दुनेदार, पंचायत समिती सदस्य शारदा कोरेटी, कविता गुरनुले, माधुरी मडावी, सुनंदा हलामी यांनी भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RW91U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना