शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

येत्या चोवीस तासांत विदर्भ, मराठवाड्यात वादळासह गारपीटीची शक्यता

Wednesday, 7th February 2018 08:08:44 AM

गडचिरोली, ता.७: विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारदरम्यान वादळ व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, शेतकऱ्यांनी कापलेल्या पिकाचे संरक्षण करण्यासंबंधी योग्य काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये, तसेच अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात गारपीटही होण्याची शक्यता आहे. ११ व १२ फेब्रुवारीला या जिल्ह्यांमध्ये वादळ व गारपिटीची शक्यता अधिक असेल. १३ फेब्रुवारीला वादळाची तीव्रता कमी होईल आणि १४ ला हवामान सर्वसाधारण होईल, असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर, कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करुन धान्य योग्यरित्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनीदेखील संरक्षितपणे साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा व गारपिटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JYSTV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना