शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

डॉ.प्रकाश आमटे यांची अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती

Monday, 11th December 2017 05:57:37 AM

गडचिरोली, ता.११: रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची सेंट्रल अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाचे सचिव एम. रवीकुमार(आयएफएस) यांनी आज डॉ.आमटे यांना नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.

डॉ.प्रकाश आमटे यांनी १९७३ मध्ये अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे वास्तव्यास जाऊन लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पात त्यांनी वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांबरोबरच नाग, रसेल वायपर यासारख्या विषारी सापांनाही आश्रयस्थान उपलब्ध करुन दिले आहे. शिवाय शेकरु या राज्य पक्ष्यासह, मगर, माकड, मोर व अन्य पशुपक्ष्यांचेही तेथे वसतिस्थान आहे. डॉ.आमटे यांच्या जिव्हाळ्यामुळे हिंस्त्र प्राण्यांना त्यांचा लळा लागला आहे. देश व विदेशातील लोक लोकबिरादरी प्रकल्पात जाऊन डॉ.आमटे आणि हिंस्त्र प्राण्यांमधील नाते कुतुहलाने न्याहाळत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने त्यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MOUDZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना