शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

८४ पोलिस अधिकारी व जवानांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Friday, 28th April 2017 02:14:13 AM

 

गडचिरोली, ता.२८: पोलिस विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ८४ पोलिस अधिकारी व जवानांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. १ मे रोजी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाई तसेच दरोडेखोर व गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक(अभियान)नवनाथ ढवळे यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. शिवाय देसाईगंजचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांना क्लिष्ट व थरारक गुन्ह्यांची उकल व तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. आष्टी येथील सहायक पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, विलास मोरे, संदीप मंडलिक यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक महारुद्र परजणे, अशोक भापकर, सागर शिंदे, दिलीप ढेरे, नंदकुमार कदम, सुनील गायकवाड, मल्हार थोरात, अक्षय ठिकणे, अनिल लवटे यांनाही पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी राजो भिवगडे, बबलू पंगळा यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कार्यासाठी पोलिस महासंचालकांचे पदक देण्यात येणार आहे. २ उपविभागीय पोलिस अधिकारी, १ पोलिस निरीक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ९ पोलिस उपनिरीक्षक, ७ पोलिस हवालदार, २५ पोलिस नाईक, ३६ शिपाई अशा ८४ जणांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

पोलिस शौर्य पदक तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपर्तीचे शौर्यपदक प्राप्त ८ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक मनोहर नरोटी, पोलिस नाईक देवनाथ काटेंगे, दिलीप पडोटी, बाबूराव पदा, दिनकरशहा कोरेटी, शिपाई संजय उसेंउी, प्रवीण भसारकर, बापू सुरमवार यांचा समावेश आहे. या सन्मानचिन्हांमुळे गडचिरोली पोलिस दलाची मान उंचावली असून, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HCHN8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना