शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

Wednesday, 26th April 2017 01:55:41 AM

 

गडचिरोली, ता.२६: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.२५)रात्री धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत दुर्गापूर येथील एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली. सेवकराम हिचामी(२६)असे मृत युवकाचे नाव आहे.

काल रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी दुर्गापूर येथे गेले. त्यांनी सेवकरामला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि त्याची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह हटझर गावाजवळच्या रस्त्यावर नेऊन ठेवला. नक्षल्यांनी सेवकरामच्या मृतदेहावर एक चिठ्ठीही ठेवली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QIGVY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना