शनिवार, 4 मे 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
कु.अस्विका जयंत दर्वे
वाढदिवस : 04 मे

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे

Friday, 29th December 2023 07:11:15 AM

आरमोरी,ता.२९: तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे विजयी झाल्या आहेत. कुमरे यांनी सात विरुद्ध दोन मतांनी निवडणूक जिंकली.

देलनवाडी, नागरवाही व कोसरी या तीन गावांची गटग्रामपंचायत असलेल्या नऊ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी आज झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे व  अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल प्रियंका कुमरे यांचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे,डॉ.गुरुदास सेमस्कर, क्रिष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोधर रोहनकर, देवेंद्र भोयर, सूरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनीता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SFKCJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना