बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वनगुन्हयातील सात आरोपींना न्यायालयीन कोठडी

Saturday, 6th June 2015 07:31:29 AM

 

अहेरी, ता.६: मोदूमडगू येथील एका फर्निचर मार्टमधून अवैधरित्या तोडून साठविलेले सागवान लाकूड जप्त केल्याप्रकरणी न्यायालयाने सात आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आलापल्ली येथून नऊ किलोमीटर अंतरावरील मोदूमडगू येथील राहुल फर्निचर मार्टमधून आलापल्ली व अहेरी येथील वनाधिकाऱ्यांनी काल १३२ सागवान पाटया जप्त केल्या होत्या. सुमारे १.२४३ घनमीटर असलेल्या या सागवान लाकडांची बाजारभावानुसार किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

याप्रकरणी फर्निचर मार्टचा मालक असित हलदर, वसंत वसाके, विभूती घरामी, शंकर मडावी, बिलू कुसराम, रामन्ना अंगूवार व रमेश काटेल यांना अटक केली होती. आज सातही जणांना अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी पी.बी.आत्राम, इंगळे, देवगडे, मेश्राम, प्राची काळे, मत्तेवार, मडावी, सडमेक, कुमरे आदींनी केली.

येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज आलापल्लीनजीकच्या एका फर्निचर मार्टवर धाड घालून सुमारे दीड लाख रुपयांचे सागवान फर्निचर जप्त केले. याप्रकरणी फर्निचर मार्टचा मालक असीत हलदर याच्यासह अन्य सात जणांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली आहे. असित हलदर याचे राहुल फर्निचर मार्ट असून, तेथे तो अवैधरित्या तोडलेली सागवान लाकडे साठवून ठेवून त्याचे फर्निचर बनवून विकत असल्याची चर्चा होती. आरोपींची चौकशी केल्यानंतर बरीच माहिती मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0T0S6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना