गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीचे रजत राऊत अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाद्वारे सन्मानित

Saturday, 16th May 2015 09:28:03 PM

 

गडचिरोली, ता.१७: येथील रहिवासी रजत राऊत यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित मिशिगन विद्यापीठाद्वारे नुकतेच विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी बहाल करुन सन्मानित करण्यात आले.

रजत राऊत हे येथील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक हितवाद व पीटीआय या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी रोहिदास राऊत यांचे चिरंजीव असून, त्यांची आई अरुणा राऊत या गडचिरोली नगर परिषदे शाळेत शिक्षिका आहेत. रजत राऊत यांचे प्राथमिक शिक्षण्‍ा गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत झाले. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी मुंबई येथील फ्रान्सिस सेंट रॉड्रीग्ज इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर रजत राऊत यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात निवड झाली. तेथे त्यांनी पदव्युतर शिक्षण प्राप्त केले. त्यासाठी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित खास समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.ग्लेम डी. एमरोज यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष  डॉ.सुशन ई. स्कॉचलॅक, मिशिगन टेक अॅलूम्नाय असोसिएशनचे अध्यक्ष एडविन एफ. आईस्वर्थ आदी मान्यवर उपस्थित होते. रजतचे वडील रोहिदास राऊत व आई अरुणा राऊत यांनाही अमेरिकेत आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ हे जगातील नामांकित १०० विद्यापीठांपैकी एक आहे, हे येथे उल्लेखनीय. रजतच्या या यशाबद्दल चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SKNHL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना