शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

३ हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षकास अटक

Wednesday, 4th March 2015 06:58:20 AM

 

गडचिरोली, ता.४

कंत्राटदार असलेल्या ट्रॅक्टरमालकाकडून ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज एका वनरक्षकास घोटपासून दोनशे मीटर अंतरावर अटक केली. नारायण सोळंके असे वनरक्षकाचे नाव असून, तो मार्कंडा(क) वनपरिक्षेत्रातील बहादूरपूर बिटमध्ये कार्यरत आहे

तक्रारकर्ता कंत्राटदार कन्हाळगाव येथील स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम करीत आहे. त्याचा ट्रॅक्टर स्त्याच्या कामावर असल्याने गिट़टी, बोल्डर व अन्य वाहतुकीचे काम त्याद़वारे होत होते. मात्र हे काम अवैध असून, कारवाई व्हावी असे वाटत नसेल तर रक्कम द़यावी लागेल, अशी मागणी वनरक्षकाने केली. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी आज सापळा रचला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घोटपासून दोनशे मीटर अंतरावरील रस्त्यावर वनरक्षक सोळंके यास ३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रोशन यादव, पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार लाकडे, शिपाई परिमल बाला, वसंत जौंजालकर, मिलिंद गेडाम यांनी ही कारवाई केली. कोणताही अधिकारी वा कर्मचारी लाच मागत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5F1GJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना