शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

Tuesday, 3rd March 2015 11:36:23 PM

 

देसाईगंज, ता.४: तालुक्यातील सावंगी येथील आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकाने देसाईगंज येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. निर्मलेश गणपतराव बोंदरे(३५) असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे.

मूळचे नागपूर जिल्हयातील काटोल येथील रहिवासी असलेले निर्मलेश बोंदरे हे सावंगी येथील आयडीबीआय बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. देसाईगंजमधील गांधी वॉर्डातील श्री.पवार यांच्या घरी ते भाडयाने राहत होते. आज सकाळी राहत्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सावंगी येथे आयडीबीआय बँकेची शाखा उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे आज(ता.४) या बँकेचा वर्धापन दिनही होता. मात्र याच दिवशी निर्मलेश यांनी आपली जीवनयात्रा संपविली. निर्मलेश यांना मायग्रेनचा त्रास होता. नुकतेच ते औषधोपचार करुन आले होते, असे सांगितले जात आहे. डोकेदुखी असहय झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ़ठीत लिहून ठेवल्याची चर्चा आहे. देसाईगंज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
09MG1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना