गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

"त्या"चार जणांच्या पोलिस कोठडीत वाढ

Tuesday, 3rd March 2015 07:30:21 AM

 

गडचिरोली, ता.३

बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके,  विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व संजय दयानंद सातपुते या चारही जणांच्या पोलिस कोठडीत जिल्हा न्यायालयाने ५ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

 तपासादरम्यान  शिष्यवृत्ती घोटाळयात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २२ फेब्रुवारीला आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यास नागपुरातून, तर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे यास गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक विजय बागडे व आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपिक संजय सातपुते यांनाही अटक करण्यात आलीी. या चौघांनाही सोमवारी (ता.२३) मुख्य न्याय दंडाधिका-यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने २८ फेब्रुवारीला सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यां‍च्या पोलिस कोठडीत ३ मार्चपर्यंत वाढ केली होती. ही मुदत संपल्याने त्यांना पुन्हा आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DF651
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना