गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस उपनिरीक्षक, पोलिस पाटील एसीबीच्या जाळयात

Tuesday, 3rd March 2015 06:37:07 AM

 

गडचिरोली, ता. ३: बोल्डर व गिट़टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ट्रॅक्टरमालकाकडून साडेसात हजार रुपयांची लाच स्वीकारताना चामोर्शीचे पोलिस उपनिरीक्षक नेपालचंद्र दिनदयाल मुजुमदार(५३) व वालसरा येथील पोलिस पाटील भगीरथ भांडेकर यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.

ट्रॅक्टरमालक ट्रॅक्टरद़वारे गिट़टी व बोल्डर वाहतुकीचे काम करीत होता. त्याचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर तो कारवाई न करता सोडून देण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक नेपालचंद्र मुजुमदार यांनी त्यास साडेसात हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ट्रॅक्टर मालकाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी आज सापळा रचून पीएसआय मुजुमदार यांना पोलिस पाटील भगीरथ भांडेकर याच्यामार्फत साडेसात हजार रुपये स्वीकारताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, दामदेव मंडलवार यांच्या नेतृत्वात हवालदार विठोबा साखरे, रवींद्र कत्रोजवार, उमेश मासुरकर, नरेश आलाम, चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक श्री.आचेवार व त्यांचे सहकारी मनोहर, भास्कर, संतोष व महेश मांढरे यांनी ही कारवाई केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K9X8R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना