शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकारी व लिपिकांच्या पोलिस कोठडीत वाढ

Saturday, 28th February 2015 07:12:13 AM

 

गडचिरोली, ता.२८

बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके,  विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व संजय दयानंद सातपुते या चारही जणांच्या पोलिस कोठडीत जिल्हा न्यायालयाने ३ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

 तपासादरम्यान  शिष्यवृत्ती घोटाळयात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २२ फेब्रुवारीला आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यास नागपुरातून, तर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे यास गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक विजय बागडे व आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपिक संजय सातपुते यांनाही अटक करण्यात आलीी. या चौघांनाही सोमवारी (ता.२३) मुख्य न्याय दंडाधिका-यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यां‍च्या पोलिस कोठडीत वाढ केली असून, आता त्यांचा मुक्काम ३ मार्चपर्यंत वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KV3K9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना