/* */
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

१२ किलो गांजा जप्त, बापलेकांना अटक

Saturday, 3rd June 2023 06:44:34 AM

गडचिरोली,ता.३: आज सकाळी मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या दोन इसमांकडून सुमारे १२ किलो गांजा जप्त केला. आनंद सपन मंडल व आलोक आनंद मंडल अशी आरोपींची नावे असून, दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत.

मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली येथून परराज्यात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी बंदुकपल्ली गावातून चंद्रपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर पाळत ठेवली. ट्रॅव्हल्स मुलचेरा येथे येताच पोलिस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंद मंडल याची झडती घेऊन त्याच्याकडून ७ किलो गांजा जप्त केला. त्यानंतर आनंद मंडल याने त्याचा मुलगा दुसऱ्या ट्रॅव्हल्सने चंद्रपूरला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार मुलचेरा पोलिसांनी गोंडपिपरी पोलिसांशी संपर्क साधला. गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक जीवन राजगुरु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रॅव्हल्सची तपासणी करुन आलोक मंडल याच्याकडून ५ किलो गांजा जप्त केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

२७ मेच्या रात्री गडचिरोली पोलिसांनी शहरातील इंदिरानगर नाक्यावरुन एका युवतीसह तीन जणांना १ लाख रुपयाच्या गांजासह अटक केली होती. त्यानंतर आठवडाभरातच जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6ZH1V
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना