/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२६: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना त्यांच्याच बंगल्यावर जाऊन धमकावल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी खांडवे यांना निलंबित केले आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्या
सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्या
राजेश खांडवेंची चमकदार कामगिरी
राजेश खांडवे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी आहेत. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१५ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक झाले. पहिलीच पदस्थापना गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्यानंतर त्यांना नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० पथकाची जबाबदारी सोपवण्यात आली. या विभागात त्यांनी अतिशय दमदार कामगिरी केली. तब्बल १६ नक्षलविरोधी अभियानांचे नेतृत्व करुन काही नक्षल्यांना कंठस्नानही घातले. या कामगिरीमुळे राजेश खांडवे यांना तब्बल दोनदा २०१८ आणि २०२० मध्ये राष्ट्रपतींचे शौर्यपदक प्राप्त झाले. शिवाय आधी सहायक पोलिस निरीक्षक आणि नंतर पोलिस निरीक्षक अशा दोन पदोन्नत्याही मिळाल्या. जेथे पोलिस निरीक्षक होण्यासाठी १५ ते २० वर्षे लागतात, ते खांडवे यांना अवघ्या सात वर्षांत मिळाले. यामुळे पोलिस दलाची मान उंचावली. काही महिन्यांपूर्वीच खांडवे यांना चामोर्शी पोलिस ठाण्याचा प्रभार देण्यात आला. येथेही अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली. त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गण्यारपवार यांच्या मारहाण प्रकरणात खांडवे यांच्यावर कारवाई न करता त्यांना अभय दिले. परंतु पुढे खांडवे यांची मजल न्यायाधीशांना धमकावण्यापर्यंत गेली आणि येथेच गणित बिघडले.
राजेश खांडवे यांनी वर्दीचा अभिमान न बाळगता थोडा संयम ठेवला तर त्यांच्यासारख्या गुणवान अधिकाऱ्यावर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया आता पोलिस दलातूनच व्यक्त होत आहे.