/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: देसाईगंज आणि आरमोरी येथील पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तक्रारींचा गठ्ठा वाढत गेल्याने या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.
देसाईगंजचे पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांना गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. आरमोरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांना किटाळी येथील कमांडो प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख करण्यात आले आहे. किटाळी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख संदीप मंडलिक यांना आरमोरीचे ठाणेदार बनविण्यात आले आहे. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांना देसाईगंजचे ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्याचे पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी ‘गडचिरोली वार्ता’ला सांगितले.
विशेष म्हणजे, देसाईगंजचे पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. अवैध दारुविक्री, अवैध सावकारीचे प्रकरण, शिवाय अन्य प्रकरणातही पोलिस अधीक्षकांनी स्वत: चौकशी केली होती. त्यानुसार मेश्राम यांची बदली झाल्याची चर्चा आहे.