/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: आज सकाळी शहरातील कृषी विभागाच्या रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला संध्याकाळी यश आले.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील कॉम्प्लेक्स परिसरात कृषी विज्ञान केंद्र, ‘आत्मा’ आणि कृषी चिकित्सालय ही कार्यालये आहेत. या चिकित्सालयाच्या मागेच रोपवाटिका आहे. तीत एक वाघीण दिसून आली आणि एकच खळबळ माजली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लागलीच पोलिसांना पाचारण करण्यात आले. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. वाधिणीला पकडण्यासाठी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास पिंजरा बोलावण्यात आला. त्यानंतर चंद्रपूर येथून बचाव पथकही आले. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
जेथे वाघीण होती; त्याच्या समोरच कृ्षी महाविद्यालय आहे. तेथे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शिवाय मागे कर्मचाऱ्यांची वसाहत, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलिस अधीक्षक, न्यायाधिशांची निवासस्थाने आणि बाजूला जिल्हा परिषद आहे. शिवाय रस्ताही वर्दळीचा आहे. त्यामुळे वाघिणीला जेरबंद करणे आवश्यक होते. अखेर वनविभागाला त्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही वाघीण नेमकी कुठली आहे, याविषयी लवकरच उलगडा होईल, असे गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी सांगितले.