/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
कोरची,ता.२:भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने २ जण जागीच ठार, तर १० जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारासकोरची-कुरखेडा मार्गावरील मोहगाव नजीकच्या वळणावरघडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
सबीलाल भारत सोरी(५७) रा.मोहगाव, असे मृत इसमाचे नाव आहे. यातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कळू शकले नाही. युग नामदेव तुलावी (वय ६महिने), अंजना रोशन मडावी (२६) रा.पड्यालजोब, पूजा नामदेव तुलावी (२५) रा.लवारी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अन्य जखमीमध्ये नामदेव वासुदेव तुलावी (२८) रा.लवारी,उसन मारोती लाडे (५२) रा.कराडी, जयसिंग नावलसिंग फुलकवर( २४) रा.पांडूटोला, सोनल नरसिंग फुलकवर (३) रा.पांडूटोला, रेशमी रवींद्र मडावी( ३५) रा.बेळगाव, राशी रवींद्र मडावी (९) रा.बेळगाव,सुरेखा हिरा निकोडे (३२) रा.बेळगाव यांचा समावेश असून, त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे
आजएम.एच०४-बी.क्यू१९२४ क्रमांकाचे क्रूझर वाहन कोरची येथून १० प्रवासी घेऊनकुरखेड्याकडे जात होते.दरम्यान मोहगावनजीकच्या वळणावर या वाहनानेविरुद्धदिशेनेयेणाऱ्या मोटारसायकलला जबर धडक दिली.यात मोटारसायकस्वार सबीलाल भारत सोरी यांचा मृत्यू झाला. क्रूझरने धडक देताच श्री.सोरी हे सुमारे २० फूट फेकले गेले. क्रूझ्र वाहनसुद्धा दोनदा उलटले. या वाहनातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले. जखमींवर कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैघकीय अधीक्षक डॉ अभय थुल यांच्या मार्गदर्शनात डॉ.राहुल राऊत उपचार करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच कोरचीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकर यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमी रुग्णांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेचा पंचनामा केला.