शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली नगर परिषदेने गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: विजय गोरडवार

Wednesday, 30th November 2022 12:35:24 AM

गडचिरोली,ता.३०:येथील नगर परिषदेने नुकतीच गृहकरात अवाजवी वाढ केल्याने गोरगरीब नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही करवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी नगर परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांनी केली आहे.

विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी संजय मीणा यांची भेट घेऊन करवाढ कमी करण्याची मागणी केली. नगर परिषदेने यंदा केलेली गृहकर वाढ ही मागील वर्षीपेक्षा चारपट अधिक आहे. एवढा कर भरणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे ही करवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी गोरडवार यांनी केली.

शिवाय शहरातील गटारांचा अनियमित उपसा, बंद वीज दिवे, मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर इत्यादी समस्यांकडेही लक्ष देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात नईम शेख, भास्कर निमजे, नागोराव उईके, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अमर खंडारे, मल्लय्या कालवा, विजय जाधव, खेमदेव हस्ते यांचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40QH5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना