/* */
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2023
लक्षवेधी :
  बलात्कार करुन प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास जन्मठेपेची शिक्षा: ग्डचिरोलीच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचा‍ निवाडा             बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या नवेगावच्या २ महिलांच्या घरावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड: आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त             मुरुमगाव येथील ३ कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक             क्रूझर-मोटारसायकल अपघातात २ ठार,१० जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर: कोरची-कुरखेडा मार्गावरील मोहगाव नजीकची घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

७० लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अटक

Sunday, 27th November 2022 06:50:13 AM

गडचिरोली,ता.२७: नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

चैनू आत्राम(३९), दानू आत्राम(२९) दोघेही रा. आलदंडी,शामराव वेलादी(४५),संजय वेलादी(३९), किशोर सोयाम(३४) तिघेही रा.चंद्रा,बाजू आत्राम(२८),रा. येरमनार टोला, मनिराम आत्राम(४५) रा.रापल्ले, जोगा मडावी (५०) रा. येरमनार टोला, लालसू तलांडे (३०) रा.येरमनार व बजरंग मडावी (४०) रा.मल्लमपल्ली ता. अहेरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काही जणांनी नक्षल्यांच्या वेशभूषेत ५ नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचाऱ्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास ७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करुन जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सर्व जण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उपरोक्त १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VVS1R
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना