/* */
रविवार, 4 डिसेंबर 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात: आरोपीस अटक न करण्यासाठी मागितली साडेतीन हजार रुपयांची लाच             कोरची येथील एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक             अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील विदर्भपूरआयोग५ डिसेंबरला गडचिरोलीत: पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार             गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: राष्ट्रवादीचे नेते विजय गोरडवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी           

छत्तीसगडसाठी जीवनदायी ठरलेल्या शिवनाथ नदीची गोडरीत महाआरती

Saturday, 24th September 2022 07:17:41 AM

गडचिरोली,ता.२४: ‘धान का कटोरा’म्हणून प्रख्यात असलेल्या छत्तीसगड राज्याला सिंचन आणि पेयजलाची सोय करून देणाऱ्या शिवनाथ नदीची महाआरती आज कोरची तालुक्यातील गोडरी येथे छत्तीसगडचे आमदार इंदलसाय मडावी यांच्या हस्ते करण्यात आली.

कोरची तालुक्यातील गोडरी येथून शिवनाथ नदीचा उगम होतो.परंतु या नदीचा कोरची तालुक्याला फारसा उपयोग होत नाही. उलट छत्तीसगड राज्यातील चौकी,राजनांदगाव,रायपूर,भिलाई इत्यादी मोठ्या शहरांपासून अन्य गावांना सिंचन आणि पेयजलाची सोय शिवनाथ नदीमुळेच झाली आहे. त्यामुळे ही नदी आपल्यासाठी जीवनदायी आहे,अशी धारणा छत्तीसगडच्या नागरिकांची आहे. म्हणूनच छत्तीसगड शासनाने या नदीची महाआरती करण्याचे ठरविले. त्यानुसार आज शिवनाथ नदीचे उगमस्थान असलेल्या गोडरी गावात छत्तीसगड शासनाचे प्रतिनिधी आमदार इंदलसाय मडावी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी उपस्थित होते. याप्रसंगी देऊळभट्टी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच गिरीजा कोरेटी, कोरची पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण मातलाम, राजेश नैताम, परमेश्वर लोहंबरे, झुल्फिकार खेतानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, अविनाश हुमणे, चेतन कराडे, स्वप्निल कराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय जैन, तर आभार प्रदर्शन मनोज अग्रवाल यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनपाल टाटपलान,भुवन मुलेटी,पंकज बघवा, दयाराम पंधरे, हिरा आडुलवार, अर्जुन कोरेटी,पन्नालाल फुलारे यांनी विनोद कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य केले. 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3RXC4
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना