गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रक्तदान शिबिर घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा

Saturday, 17th September 2022 02:13:23 AM

गडचिरोली,ता.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील महिला व बाल रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.अशोक नेते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ८ वर्षांच्या काळात सुशासन दिले असून, हे सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे खा.अशोक नेते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी खा.अशोक नेते यांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचे लाभार्थी आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, विलास भांडेकर, विलास दशमुखे, डॉ.चव्हाण, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, माजी नगरसेविका वर्षा शेडमाके,लता लाटकर,वैष्णवी नैताम,कविता उरकुडे, प्रतिभा चौधरी,रश्मी बाणमारे, वनमाला कन्नाके, बंडू झाडे, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, विवेक बैस, राजू शेरकी, सागर कुमरे अनिल तिडके, हर्षद गेडाम, मधुकर भांडेकर, आशिष कोडाप, आशिष रोहनकर, पायल कोडापे, पारस राऊत,धनंजय सहदेवकर, आनंद कुमरे, संजय मांडवगडे, मंगेश रणदिवे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TEAW6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना