गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात आढळले स्क्रब टायफसचे तीन रुग्ण

Thursday, 15th September 2022 07:32:37 AM

गडचिरोली,ता.१५: जिल्ह्यात स्क्रब टायफस या आजाराने शिरकाव केला असून, तीन जणांना या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

बाधित रुग्ण हे कुरखेडा, देसाईगंज आणि धानोरा तालुक्यातील आहेत. या तिघांना ताप आल्यानंतर त्यांचे नमुने नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, तिघेही जण बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.धवल साळवे यांनी दिली.

‘माईट’ या अतिशय लहान कीटकापासून स्क्रब टायफस या आजाराची लागण होते. ताप, डोकेदुखी, मळमळ अशी या आजाराची लक्षणे असून, त्वचेवर काळा चट्टा येतो. योग्य उपचार घेतल्यास रुग्ण आजारातून बरा होतो. रुग्ण दगावण्याची शक्यता केवळ ५ ते ६ टक्केच असते, असे डॉ.साळवे यांनी सांगितले.

राज्य सरकारने स्क्रब टायफस या आजाराविषयी राज्यभरात हाय अॅलर्ट जारी केला आहे. आता गडचिरोली जिल्ह्यातही या आजाराचा शिरकाव झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KQJI2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना