/* */
रविवार, 4 डिसेंबर 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात: आरोपीस अटक न करण्यासाठी मागितली साडेतीन हजार रुपयांची लाच             कोरची येथील एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक             अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील विदर्भपूरआयोग५ डिसेंबरला गडचिरोलीत: पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार             गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: राष्ट्रवादीचे नेते विजय गोरडवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी           

पाऊस थांबला; मात्र, पुरामुळे गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद

Wednesday, 14th September 2022 07:24:03 AM

गडचिरोली,ता.१४: कालपासून पावसाने उघाड दिला असला तरी गोसेखुर्द धरणासह अन्य धरणांमधून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली-आरमोरी-नागपूर आणि गडचिरोली-चामोर्शी या प्रमुख मार्गांवरील वाहतूक आज संध्याकाळपासून ठप्प झाली आहे.

दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने तब्बल १६ मार्ग बंद होते. मात्र, कालपासून पाऊस थांबल्याने १४ मार्ग सुरु झाले असताना आज गोसेखुर्द धरणातून ८८८४.८७ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गडचिरोलीनजीकच्या पाल नदीला पूर आला. यामुळे गडचिरोली-नागपूर मार्ग बंद झाला. तसेच शिवणी नाल्याला पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MV01O
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना