बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लॉयड मेटल्सच्या शिबिरात ९२४ नागरिकांची आरोग्य तपासणी

Tuesday, 13th September 2022 12:24:37 AM

गडचिरोली,ता.१३: लॉयड मेटल ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथे रविवारी (ता.११) आरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिरात परिसरातील ९२४ नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना औषधोपचार व संदर्भ सेवा देण्यात आली. यावेळी ३५ जणांनी रक्तदानही केले.

हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.दडस यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी मोहर, आलदंडी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी येनपे, उडेराचे सरपंच गणेश गोटा, पोलिस पाटील महेश मट्टामी, भूमिया बिरसू मट्टामी, गाव पाटील चैतू मट्टामी, आलदंडीचे माजी सरपंच चैतू मट्टामी उपस्थित होते.

शिबिरामध्ये ९२४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील अस्थिरोगासंदर्भातील १२० जणांची तपासणी करुन १७ जणांना रेफर करण्यात आले. त्वचा रोगाच्या १०१ व स्त्रीरोगाच्या ७१ जणांची तपासणी करून ६ रूग्णांना संदर्भसेवा देण्यात आली. तपासणी केलेल्या ६७ बालकांपैकी चार बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसंदर्भातील ४० जणांची तपासणी करून १४ जणांना संदर्भित करण्यात आले. कान, नाक, घसा रोगाच्या ४१ जणांची तपासणी करून सात जणांना संदर्भित करण्यात आले आहे. यासोबतच २५० जणांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. ११० जणांना चष्मा वाटप, ८ इसीजी, मलेरिया चाचणी २४, डेंग्यू चाचणी १२ व १६ जणांची टायफाईड तपासणी तसेच ४० जणांची रक्त शर्करा तपासणी करण्यात आली.

बालरोगतज्ज्ञ डॉ. टी. स्वाती रेड्डी, शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र बोस नाईक, डॉ. रामक्रिष्ण गणपतीवार, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पी. नागराजू,  अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. साईचरण रेड्डी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रणय गांधी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनंत जाधव, एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री मारटकर, डॉ. जास्मीना टेंभुर्णे, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन इंगोले, ऑप्टोमेट्रिस्ट विवेक यांनी नागरिकांची तपासणी केली. तपासणी शिबिरामुळे स्थानिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5C894
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना