/* */
रविवार, 4 डिसेंबर 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात: आरोपीस अटक न करण्यासाठी मागितली साडेतीन हजार रुपयांची लाच             कोरची येथील एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक             अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील विदर्भपूरआयोग५ डिसेंबरला गडचिरोलीत: पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार             गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: राष्ट्रवादीचे नेते विजय गोरडवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी           

महागाईचा विरोध: केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची रॅली

Friday, 5th August 2022 07:39:31 AM

गडचिरोली,ता.५: महागाई वाढल्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज गडचिरोली येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून घोषणाबाजी केली.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयापासून रॅली काढून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत काँग्रेस कार्यकर्ते पोलिस ठाण्यात पोहचले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रुपाली पंदिलवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव भावना वानखेडे, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, ज्ये्ष्ठ नेते हसनअली गिलानी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, पुष्पा कुमरे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वजित कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, दिलीप घोडाम, हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, सुखदेव वासनिक, सुनील चडगुलवार, नंदू कायरकर, दीपक मडके, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, कुसुम आलाम, आशा मेश्राम, गीता खानोरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EW3YJ
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना