शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

एटीएम मशिन फोडणाऱ्या तिघांना अटक: देसाईगंज पोलिसांची कारवाई

Wednesday, 6th July 2022 07:23:04 AM

गडचिरोली,ता.६: पैसे चोरण्याच्या हेतूने बँक ऑफ इंडियाची एटीएम मशिन फोडणाऱ्या तीन जणांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. राहुल बकाराम खरकाटे(२८), मुजशिर शब्बीर शेख(३१) व महेंद्रसिंह सूरजसिंह बावरी(४६) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, तिघेही जण देसाईगंज येथील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी आहेत.

१६ ते १७ जूनच्या रात्री या तिघांनी देसाईगंज येथील बँक ऑफ इंडियाची एटीएम मशिन फोडण्याच्या हेतूने सर्वप्रथम एटीएम मशिन असलेल्या खोलीचे काच फोडले. त्यानंतर मशिनही फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मशिनमधून पैसे काढण्यात त्यांना अपयश आले. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला. आज तिघांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, शिपाई श्रीकृष्ण जुवारे, निकलेश सोनवणे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AS5QX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना