/* */
गुरुवार, 18 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
   १६ ऑगस्ट: पुरामुळे भामरागडमधील २३०,देसाईगंज ४६, सावंगी ३७, वघाळा येथील ३५ अशा ४३१ जणांना सुरक्षित स्थळी हलविले             १६ ऑगस्ट: गोसेखुर्द धरणातून ६ लाख ५ हजार ४७५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, पूरस्थिती बिकट होण्याची चिन्हे             गडचिरोली पोलिस दलातील तिघांना शौर्य चक्र, ४२ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर २ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक             गडचिरोली: मुसळधार पावसामुळे गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-आलापल्ली, आष्टी-गोंडपिपरी, आलापल्ली-भामरागड यांसह १९ मार्ग बंद             स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा, गडचिरोलीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण             स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला मुडझा येथील शेतकऱ्याची आत्महत्या: सतत चारवेळा धानपीक पुरात सापडल्याने केली आत्महत्या           

आंतरविद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण आणि कांस्य पदक

Friday, 1st July 2022 06:47:27 AM

गडचिरोली,ता.१: जयपूर येथे २७ ते ३० जूनदरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावले आहे.

जयपूर येथील जगन्नाथ विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांच्या २९ संघांनी भाग घेतला होता.वूडबॉल क्रीडा प्रकारात स्ट्रोक स्पर्धेत अंजली चौधरी, अनुजा खिरटकर, विशाखा भोयर, मयुरी गाडगे, गुलाबशा सय्यद, इशा फुलबांधे,साक्षी मेश्राम,शुभांगी भोस्कर या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले. महिलांच्या दुहेरी स्पर्धेत अंजली चौधरी व अनुजा खिरटकर,तर मिश्र दुहेरीत मयूर भोयर, ईशा फुलबांधे या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले.

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल चिताडे आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता लोखंडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NZ61F
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना