बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील सहा वाहने जाळली

Thursday, 30th June 2022 05:59:04 AM

गडचिरोली ता,३०: भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत विसामुंडी येथील निर्माणाधीन रस्त्याच्या बांधकामावरील सहा वाहने आणि दोन मिक्सर मशीनची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघड़कीस आली आहे.

विसामुंडी येथे रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र काल रात्री २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी बांधकामस्थळी गेले. त्यांनी कामावरील मजुरांना झोपेतून उठवून मारहाण केली. त्यानंतर एक पोकलेन, एक जेसीबी, दोन, ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकलींना आग लावली. शिवाय दोन सिमेंट मिक्सर मशीनही जाळून टाकल्या. या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
61R4K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना