गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे घडली. किशोर तुळशीदास मामीडवार (३०) असे मृत इसमाचे नाव आहे. किशोर मामीडवार हा आज सकाळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेला होता. काही वेळाने पोर्ला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६ मधील राखीव जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.