/* */
शनिवार, 2 जुलै 2022
लक्षवेधी :
  अ.भा.आंतरविद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने पटकावले सुवर्ण आणि कांस्य पदक             नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील सहा वाहने जाळली: भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथील घटना             वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार: आरमोरी तालुक्यातील बोरीचक येथील घटना             कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना कुरखेडा नगर पंचायतीचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

मैत्रिणीसोबत जंगलात गेलेला युवक झाला वाघाची शिकार

Tuesday, 3rd May 2022 07:29:00 AM

गडचिरोली,ता.३: मैत्रिणीसह जंगलात गेलेल्या युवकास वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावरील जंगलात घडली. अजय सोमेश्वर नाकाडे(२४) असे मृत युवकाचे नाव असून, तो चोप(कोरेगाव) येथील रहिवासी आहे.

अजय नाकाडे हा आज चारचाकी वाहनाने एक मित्र आणि मैत्रिणीसह उसेगाव येथील जंगलात गेले होते. अजयचा मित्र वाहनात बसून होता, तर अजय आणि त्याची मैत्रिण जंगलात गेले. एवढ्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने अजयवर हल्ला केला. झाडाची फांदी पडली असेल म्हणून मैत्रिणीने मागे वळून बघितले असता तिला साक्षात वाघ दिसला. वाघाने अजयच्या नरडीचा घोट घेऊन त्याला फरफटत दूरवर नेले. या झटापटीत त्याच्या मैत्रिणीलाही ओरबाडले. मैत्रिण धावत वाहनाजवळ आली. त्यानंतर अजयचा मित्र आणि मैत्रिणीने उसेगाव येथील नागरिकांना घटना सांगितली. काही वेळातच गावकरी, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिस निरीक्षक महेश मेश्राम हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांना अजयचा मृतदेह जंगलात एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाघाने फरफरट नेल्याचे आढळून आले.

संध्याकाळी शवविच्छेदन केल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वनविभागाकडून अजयच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

फलकाजवळच उभे ठेवले वाहन 

शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावर घनदाट जंगल आहे. या जंगलात नरभक्षक वाघाचा वावर असून, काही महिन्यांपूर्वी वाघाने एका व्यक्तीला ठार केले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने त्या परिसरातील रस्त्यावर ‘नरभक्षक वाघापासून सावधान’ असा फलक लावला आहे. परंतु अजय आणि त्याच्या मित्राने नेमके त्याच ठिकाणी वाहन उभे केले आणि त्याच जंगलात गेले. परिणामी अजयला जीव गमवावा लागला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UEV1Y
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना