/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२५: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना आणि आरोग्यसुविधांविषयक आढावा घेतला.
गडचिरोली जिल्हा सुरूवातीला लसीकरणात राज्यस्तरावर मागे होता. परंतु मागील दोन महिन्यांत विविध उपक्रम राबविल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. परिणामी जिल्हा ३१ व्या क्रमांकावरुन १६ व्या क्रमांकावर आला, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली. घरोघरी लसीकरण मोहीम राबविल्यामुळेच हे यश मिळाल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी नमूद करत प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी कोविड संसर्गासह आरोग्य सुविधा, दवाखान्यांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रीक ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिट याबाबत माहिती घेतली.