शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

Friday, 21st January 2022 06:31:36 AM

गडचिरोली,ता.२१: जंगलात गुरे चारावयास गेलेल्या गुराख्यास वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील कुरंझा येथे घडली. जालमशहा गोविंदशहा सयाम(६५) रा.कुरंझा असे मृत इसमाचे नाव आहे.

जालमशहा सयाम हा काल गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. संध्याकाळी घराकडे परत येताना त्यास एक बैल दिसला नाही. त्यामुळे तो पुन्हा जंगलात गेला. तेव्हा झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने जालमशहावर हल्ला करुन त्यास ठार केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VPMXY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना