/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: जिल्ह्यात आज १ हजार २२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात २२४ जण बाधित आढळून आले. शिवाय ९९ रुग्ण आजारातून बरे झाले.
आजच्या नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११७, अहेरी १०, आरमोरी ९, भामरागड ५, चामोर्शी २३, धानोरा १८, एटापल्ली ३, मुलचेरा ९, कोरची २, कुरखेडा ९, सिरोंचा २ आणि देसाईगंज तालुक्यातील १७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ३७१ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार ६६४ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के, तर मृत्यूदर २.३२ टक्के एवढा आहे.