मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

हळद लागवडीसाठी जि.प. पुढाकार घेणार

Sunday, 22nd June 2014 08:15:25 AM

गडचिरोली : हळद लागवडीसाठी क्षेत्रवाढ प्रक्रिया मूल्यसंवर्धन व बाजार व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष पुढाकार घेतला जाणार आहे. या संदर्भातील निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या हळद लागवडीबाबतच्या बैठकीत अधिकार्‍यांना दिले आहे. 
बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जि.प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, व्ही. बी. महंत, प्रा. योगिता सानप, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. प्रशांत सोळूंखे, डॉ. सुधीर बोरकर आदी उपस्थित होते. 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत २७ हेक्टर या प्राप्त लक्ष्यांकानुसार क्षेत्र विस्तारासाठी गाव, शेतकर्‍यांची समुह पध्दतीने निवड करणे, शिफारस केलेल्या पीडीके व्ही वायगाव वाणाचे बियाणे उपलब्ध होईपर्यंत स्थानिकरित्या तयार केलेले उत्कृष्ट बियाणे बीज प्रक्रिया करून वापरण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र देण्याबाबत प्रत्यक्ष शेतावर तंत्रज्ञ प्रात्यक्षिकाचे आयोजन करणे, कृषी विद्यापीठाकडून हळद काढणी यंत्र उपलब्ध करून शेतकरी गटास प्रात्यक्षिक स्वरूपात देण्याबाबत कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या बरोबरच दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रीय प्रक्रिया पध्दतीचा अवलंब अवलंब करून पीडीकेव्हीने विकसीत केलेल्या एकात्मिक हळद प्रक्रिया युनिट जिल्ह्यातील हळद उत्पादन गटांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U37BI
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना