बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बसमधील बॅगमध्ये आढळले काडतूस

Saturday, 6th December 2014 06:23:12 AM

 

गडचिरोली, ता़६

चंद्रपूर-अहेरी बसमध्ये ठेवलेल्या एका बॅगमध्ये काडतूस आढळल्याने खळबळ माजली आहे़ याप्रकरणी पोलिसांनी एका इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे़

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील इसमाने चंद्रपूर येथील बस आगारात दूरध्वनी केला़ चंद्रपूर-अहेरी बसमध्ये एक बॅग ठेवली असून, त्यात काडतूस असल्याची माहिती त्याने दिली़ त्यानंतर चंद्रपूर आगारातील अधिकार्‍यांनी ही माहिती अहेरी येथील बस आगाराला कळविली़ लागलीच अहेरीच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना माहिती दिली़ त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून बसमधील बॅग तपासली असता तीत एक काडतूस आढळून आले़ ही बॅग दूरध्वनी करणार्‍या इसमाचीच असून तो पत्रकार असल्याचे सांगतो, असे समजते़ याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री़ ढवळे यांनी दिली़ दूरध्वनी करणारा इसम कोण बॅगमध्ये काडतूस कोणी ठेवले असे नानाविध प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4IRG5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना