गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन अपघातांत ३ ठार, तर तिघे गंभीर जखमी

Saturday, 6th December 2014 05:57:13 AM

 

गडचिरोली, ता़६

नागपूरवरून येताना आष्टी-अहेरी मार्गावरील चौडमपल्ली गावाजवळ सॅन्ट्रो कार झाडाला आदळल्याने दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज(ता़ ६) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली़  कुरखेडा तालुक्यातील दुसºया अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महेश आर्इंचवार(३२) व अभय आर्इंचवार(३०) अशी कार अपघातात ठार झालेल्या सख्या भावंडांची, तर पंकज सुदलवार (२६), उमेश सेकुर्तीवार (२५), रवी बोमेन (२४) तिघेही रा़अहेरी अशी जखमींची नावे आहेत़ त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

आर्इंचवार बंधूंचे अहेरी येथे कपड्याचे दुकान आहे़ काल(ता़५) ते एमएच ३४ के ५३६९ क्रमांकाच्या सॅन्ट्रो कारने अहेरी येथील  तिघांसह नागपूर येथे कापड खरेदीसाठी गेले होते़ रात्री तेथून परत येत असताना अहेरी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली गावाजवळ त्यांची कार झाडाला आदळली़ यात दोघेही भावंड ठार झाले़ या घटनेमुळे आर्इंचवार परिवार व अहेरी नगरीवर शोककळा पसरली आहे़

कारला अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्यापैकी एकाने समयसुचकता दाखवून १८० या टोल क्रमांकावर संपर्क साधून उपचारासाठी रूग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर जखमींना नागपूरला हलविण्यात आले.  

दुसरा अपघात काल ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास कुरखेडा-तळेगाव मार्गावर झाला. दुचाकीने रत्याच्या कडेला असलेल्या किलोमीटर दर्शक दगडाला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा नागपूर येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. अशोक उर्फ विक्की कसारे (२३) रा.कुरखेडा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.  तो आपल्या एम.एच.३३/एल/०६९९ क्रमांकाच्या दुचाकीने  तळेगाव वरून कुरखेड्याकडे येत असतांना कुरखेड्यापासून १ किमी अंतरावरील वळणावर अपघात झाला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
94SJN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना