गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

काळी-पिवळीच्या अपघातात ७ जण जखमी

Friday, 5th December 2014 06:33:06 AM

 

गडचिरोली, ता़५

प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी टॅक्सी झाडाला आदळल्याने ७ जण जखमी झाल्याची घटना आज ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गडचिरोली-धानोरा मार्गावरील मेंढाटोला गावाजवळ घडली़ जखमींवर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़

भास्कर उसेंडी(३०) रा़ मोहली, व्यंकटेश लक्ष्मण पदा(४५) रा़ मोहली, आबाजी मोहुर्ले(४५) रा़ लेखा, लक्ष्मण आतला(२५) रा़ मोहगाव, अस्मिया कोवा(४०)रा क़ोहानटोला, मंगला नरोटे(५०)रा़ पवनी व एम़ डी़ सावले(५०) अशी जखमींची नावे आहेत़ एम़ डी़ सावले हे सीआरपीएफचे जवान असून त्यांना जास्त दुखापत झाली आहे़ एमएच ३३-एम ५०२५ क्रमांकाच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवासी घेऊन चालक भास्कर उसेंडी हा गडचिरोलीवरून धानोर्‍याकडे जात असताना धानोर्‍याच्या अलिकडे ३ किलोमीटर अंतरावरील मेंढाटोला गावाजवळ टॅक्सी स्लीप होऊन झाडाला आदळली़ यात ७ जण जखमी झाले़ त्यांना तत्काळ धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SKUS3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना