गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता़ ५
अहेरीचे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची राज्याच्या मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल अहेरी येथे नाग विदर्भ आंदोलन समिती व भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला़
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी निरोप आल्यानंतर राजे अम्ब्रिशराव आत्राम हे ४ तारखेलाच मुंबईला रवाना झाले होते़ आज(ता़५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राजे अम्ब्रिशराव महाराजांची वर्णी लागली आणि त्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली़ त्यांच्या निवडीबद्दल अहेरी येथे नाग विदर्भ आंदोलन समिती व भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला़ निसार सय्यद, किशोर शंभरकर, शेषराव दिवटे, प्रतीक मुधोळकर, अमोल गुडेल्लीवार, शंकर मगडीवार, मुकेश नामेवार, राकेश गुडेल्लीवार, रवी जोरगेलवार, मयूर गुम्मलवार, पवन गद्देवार, पृथ्वी कोल्लावार, रवी कारेंगुलवार, गणेश पुसालवार, श्रीकांत नामनवार, साईनाथ औतकार, रमेश समुद्रालवार, रामू कस्तुरवार, सरफराज शेख, इम्मू भाई आदींनी फटाके फोटून आनंद व्यक्त केला़