गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आत्मसमर्पित नक्षल्याची डॉक्टरांना मारहाण

Friday, 5th December 2014 12:01:25 AM

 

गडचिरोली, ता़५ 

नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या बाळाच्या पित्याने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना आज(ता़५)सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली़ बाळाचा पिता आत्मसमर्पित नक्षलवादी असून, त्याच्याविरूद्ध संबंधित डॉक्टरांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे़

एका आत्मसमर्पित नक्षल्याच्या नवजात बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला १ डिसेंबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते़ परंतु प्रकृती खालावल्याने आज सकाळी त्याने अखेरचा श्वास सोडला़ त्यानंतर घटनेची बातमी देऊन बाळाचा मृतदेह त्याच्या पित्याकडे सुपूर्द करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी पित्याला माहिती दिली़ त्यानंतर बाळाचा पिता रुग्णालयात आला आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्याने सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली़ परंतु काही वेळानंतर राग अनावर झाल्याने त्याने संबंधित डॉक्टरांना मारहाण केली़ विशेष म्हणजे, बाळाचा पिता आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याने यावेळी पोलिसही संरक्षणासाठी तैनात होते़ परंतु त्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांना मारहाण करण्यात आली़ याबाबत डॉक्टरांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, जिल्हा शल्यचिकित्सकांनीही पोलिस मुख्यालयाला पत्र दिले आहे़ यासंदर्भात पोलिस काय भूमिका घेतात याकडे रुग्णालयातील डॉक्टरांचे लक्ष लागले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EIKUX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना