मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे हजारो ग्राहकांची गैरसोय

Thursday, 4th December 2014 11:55:50 PM

 

गडचिरोली, ता़५

वेतनवाढ करण्याबरोबरच कामाचे तास निश्चित करावेत, ५ दिवसांचा आठवडा करावा, आऊटसोर्सिंगला आळा घालावा, नोकरभरती करावी इत्यादी मागण्यांसाठी आज(ता़५)बँक कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले असून, ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़

गडचिरोली येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक इत्यादी बँकांचे जिल्हाभरातील सुमारे ४५० अधिकारी व कर्मचारी आज संपावर गेले आहेत़ सकाळी १० वाजतापासून संपास सुरुवात झाली़ त्यानंतर विविध बँकांच्या कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन स्टेट बँकेसमोर घोषणाबाजी केली़ या संपात गडचिरोली येथील बँकेचे अधिकारी श्री़ सिलारे, श्री़ चंद्रवंशी, श्री़ सेता, श्री़ मेश्राम, श्री क़ाकपुरे, श्री़ दिवाकर, श्री़ दोडके, शाहिद अख्तर, श्री़ विष्णू, श्री़ ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत़ कर्मचार्‍यांच्या संपामुळे ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले़ अनेकांना आर्थिक व्यवहार करता आले नाही़ संपाचा परिणाम कर्मचारी, व्यापारी, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या आर्थिक व्यवहारावरही झाला़ अनेक जणांना मोठ्या रकमा काढता आल्या नाहीत़ स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना चालन भरता आले नाही़ गडचिरोलीबरोबरच आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा इत्यादी तालुकास्थळांसह मोठ्या गावांतील बँकांच्या शाखाही बंद होत्या़ बँक कर्मचार्‍यांचा महिनाभरातील हा दुसरा संप आहे यापूर्वी त्यांनी १२ नोव्हेंबरला एक दिवसीय संप पुकारला होता


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WURX1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना