शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आता सीजी नेटद्वारे जगभर घुमेल आदिवासींचा आवाज

Thursday, 4th December 2014 11:05:26 PM

 

गडचिरोली, ता़५ 

दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांची कमतरता या व अन्य समस्यांमुळे जर्जर झालेल्या आदिवासींना त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी आता सीजी नेट ही संस्था पुढे आली आहे़ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या हितासाठी लढू इच्छिणार्‍या स्वयंसेवकांची कार्यशाळा गडचिरोलीत सुरू असून, देशाच्या विविध प्रांतातील युवक, युवती त्यात सहभागी झाले आहेत़

‘सीज नेट’(सेंट्रल गोंडवाना नेट) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना २००४ मध्ये छत्तीसगडमध्ये झाली़ सुधांशू चौधरी या संस्थेचे संचालक आहेत़ पूर्वी ही संस्था छत्तीसगड नेट या नावाने ओळखली जात होती़ आता तिचे नामांतर झाले आहे़ छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी झटत असतानाच मध्य भारतातील गोंड आदिवासींचा आवाज ऐकला पाहिजे, असा विचार मनात आल्याने सुधांशू चौधरी यांनी संस्थेच्या कार्याचा विस्तार केला़ संस्था मोबाईल व कम्युनिटी रेडिओची संकल्पना अंमलात आणण्याचा विचार करीत आहे़ सद्या मोबाईलवरून मध्यभारतातील कुठलाही आदिवासी त्याला भेडसावणारी समस्या सांगू शकतो किंवा अन्य महत्त्वाच्या बाबी ऐकू शकतो़ केवळ समस्यांचे निवारणच नाही, तर आदिवासींची कला आणि संस्कृतीचे जतन करण्याचे कामही सीजी नेटद्वारे होत आहे़ त्यासाठी संस्थेकडे पारंपरिक वाद्य असलेल्या सुशिक्षित कलावंतांची फौजही तयार आहे़  

सीजी नेटशी संबंधित युवक, युवतींची कार्यशाळा गडचिरोलीनजीकच्या गोगाव येथील गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीत सुरू आहे़ या कार्यशाळेत छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तरप्रदेश या प्रांतासह विदेशातील दोन युवक, युवतीही सहभागी झाले आहेत़ सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या दोन चमू तयार करण्यात येणार असून, चमूतील युवक, युवती जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत़ त्यानंतर १६ मेपासून १६ जूनपर्यंत व १५ आॅगस्टपासून १५ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा हे स्वयंसेवक कामाला लागणार आहेत, अशी माहिती सीजी नेटचे संचालक सुधांशू चौधरी व गडचिरोली जिल्हा संयोजक अ‍ॅड़लालसू नरोटे यांनी दिली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0ULWC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना